18-Oct-2018 02:39:00 PM

BIRSA LIVE : 01-OCT-2018/
बोरगाव प्रतिनिधी ता.सुरगाणा ।
महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमेवर निसर्गाची देण लाभलेल्या वन विभागाच्या घनदाट जंगलात उंबरपाडा ता.सुरगाणा जवळ तात्यापाणी येथे गरम पाण्याचे दोन झरे असून झऱ्याचा विकास झाला नसल्याने येणाऱ्या पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुरगाणा तालुक्यातील उंबरठान जवळील तातापानी येथे दोन गरम पाण्याचे झरे असून येथे लहान मोठी सहा मंदिरे आहेत रामनवमीत व नवरात्रित मोठे कार्यक्रम होत असून पर्यटकांची मोठी गर्दी असते परंतु येथे झऱ्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही विजेची पुरेशी सोयनाही सभामंडप,भक्तनिवास, स्वच्छता गृह, वाहनतळ सुविधा नसल्याने येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकानी तीव्र नाराजी व्यक्त केलि आहे । येथे अनेक वेळा पर्यटन स्थळाच्या घोषणा झाल्या लाखो रूपायांच्या तरतुदी च्या अफवाहि झाल्या पण परिस्थिति जैसे थे आहे।
वनविभागाच्या हद्दीत हे दोन झरे असून एक झरा स्थानिक रतन चौधरी , सीमा गावित , लहानु गावित या तिघांनी बांधकाम करुण लोकांसाठी अंघोळ करण्यासाठी सुविधा करुण दिली आहे। तर दूसरा झरा बांधकाम करुण स्वच्छ करण्याची गरज आहे या पाण्यात अंघोळ केल्याने त्वचा रोग , गजकर्ण , अंगदुखने , नायराखाज , खरुज कमी होते।
हे गरम पानी पिल्याने रोगी बरा होत असल्याने दिवसेंदिवस लोकांची गर्दी या झऱ्या कड़े वाढत आहेत। जिल्ह्यात तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ विकास होत असताना स्थानिक आमदार , खासदार साहेबाना दोन गरम पाण्याचे झरे विकसित करण्याची कल्पना का सुचली नसावी असा प्रश्न तालुक्यातील आदिवासी जनतेला पडला आहे तातापाणी येथील दोन गरम पाण्याचे झरे गुजरात राज्यामधील उनई प्रमाणे विकास केला तर हा भाग नावा रूपाला येईल त्यामुळे आदिवासी भागात रोजगाराची संधी निर्माण होण्यास मदत होईल ।

शेयर करे

Add a Comment