18-Oct-2018 04:03:05 PM

BIRSA LIVE : 03-OCT-2018/
बोरगाव प्रतिनिधी दि.२ बोरगाव येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान आणि जीवन रक्त पेढी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२ आँक्टो.२०१८ रोजी साई काँम्लेक्स बोरगाव येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले.त्यात युवकांसह महिलांनी उत्सफूर्त प्रतिसाद देऊन ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.शिबिरात जमा होणाऱ्या रक्त साठयाचा काही भाग लष्करातील जवानांसाठी व महाराष्ट्र शासनाच्या रक्त पेढयांना देण्याचे काम या संप्रदाया माफँत केले जाते।
रक्तदान शिबीरास शिवसेना तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे, पोलिस पाटील हतगड गणेश जाधव, चंद्रकांत भरसट,कचरू महाले आदींनी भेट देऊन रक्तदान शिबीरास सदिच्छा दिल्या.शिबीर यशस्वीतेसाठी कळवण तालुका प्रमुख हिरामण वाघ,सुरगाणा तालुका प्रमुख सोनीराम धुळे, महीला तालुका अध्यक्ष हिराबाई ठाकरे, कळवण तालुका अध्यक्ष मिराबाई पवार, बसतीराम भोये, रवींद्र मोहने,श्रीकांत गावढे,राजु पाटील, पडीत जोपळे,परशराम वाघमारे ,ग्रामसेवक पळसण अशोक गवळी तसेच महिला वर्ग शोभाताई गोतुणै,रोहिणी वाघमारे, शोभा पाटील, सुमण वाघमारे, मंगल गांगुर्डे, भारती गवळी, मंगल वाघ,पुष्पा आहेर आदींनी परिश्रम घेतले. जीवन रक्त पेढी नाशिक डाँ.संदीप चौधरी, कल्पेश चौधरी, मनीषा भामरे, अभिजित कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्त संकलित केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संप्रदाय सुरगाणा, कळवण सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बहुमोल सहकार्य केले।

शेयर करे

Add a Comment